About Us
मराठी Entrepreneurs च्या व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs.
मराठी आंत्रप्रेनेर नेटवर्क फोरम (Marathi Entrepreneur Network Forum) हे मराठी उद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या फोरमची सुरुवात २३ जुन २०१५ रोजी राजेश जोशी,सुरेंद्र कुलकर्णी, नंदकुमार तळेकर, योगेश चिटगोपेकर यांनी केली. सध्या संस्थेच्या ५ शाखा पुण्यात आहेत.
या फोरमचा उद्देश मराठी भाषेतून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना एकत्र आणणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करणे आहे. फोरमचा मुख्य उद्देश हा मराठी व्यवसाईकात उद्योजकता जागृत करणे हाच आहे. त्याच बरोबर नवीन व्यवसाय संधी कशा शोधाव्यात, वित्तीय व्यवस्थापन कसे करावे , आपल्या वस्तूंची मार्केटिंग आणि विक्री कशी करावी , बाजारपेठेतील स्पर्धा कशी ओळखावी, विक्रीचे तंत्र, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग कसे करावे यावर मराठी व्यवसाईकांना मार्गदर्शन करते.
याचबरोबर व्यवसाय वृद्धी, नवीन उत्पादने किंवा सेवा सुरू करणे, तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण फोरम देते असते .
फोरम इतर उद्योजकांशी संपर्क साधून , अनुभवांची देवाण-घेवाण करणे, सहकार्याच्या संधी शोधणे. तसेच संपर्क वाढवणे: नवीन लोकांशी ओळख करून मराठी व्यवसाईकांचे नेटवर्किंग वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवातून ज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण फोर्म करीत आहे .
याच व्यवसाईकांना तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि सल्ला: मिळवणे साठी कार्यरत आहे.विविध कौशल्ये आणि तंत्रज्ञानांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करणे.
आता पर्यंत संस्थेने १२ वेळा व्यावसाईक प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. त्यातुन करोडो रुपयांची उलाढाल मराठी व्यावसायिकांनमध्ये झालेली आहे.
या फोरममध्ये मराठी उद्योजक आपले अनुभव, आव्हाने आणि यशोगाथा शेअर करतात, ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळते.
मराठी आंत्रप्रेनेर नेटवर्क फोरम हे मराठी उद्योजकांसाठी एक महत्वाचे साधन आहे ज्याद्वारे ते आपला व्यवसाय वाढवू शकतात आणि मराठी उद्योजकता क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
मराठी आंत्रप्रेनेर नेटवर्क फोरममध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा, सेमिनार, आणि चर्चा सत्रे आयोजित केली जातात ज्यामुळे सहभागी व्यक्तींना आपल्या ज्ञानाचा विस्तार करता येतो आणि व्यावसायिक विकास साधता येतो.